पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) वतीने विकसित केलेल्या पेठ क्र. १२ मधील 4000 सदनिकांच्या नोंदणीसाठी ई-नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचा प्रारंभ महानगर आयुक्त राहुल महिवाल यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. या गृहयोजनेत सुमारे ४८०० घरकुले बांधण्यात आली असून सुमारे चार हजार सदनिकांचे वाटप लॉटरी पद्धतीने करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पुणे : आरटीई प्रवेशांसाठी आतापर्यंत १ लाख ३७ हजारांहून अधिक अर्ज

या सर्व सदनिकांच्या दस्त नोंदणीसाठी प्राधिकरणाच्या वतीने हे ई-नोंदणी केंद्र नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्या सहकार्याने सुरु करण्यात आले आहे. ही ई-रजिस्ट्रेशनची प्रणाली एनआयसी पुणे यांनी विकसित केली आहे. त्यामुळे दररोज सुमारे १०० ते १५० सदनिकांची नोंदणी करणे शक्य होणार आहे. पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, अतिरिक्त नोंदणी महानिरीक्षक नंदकुमार काटकर, पीएमआरडीएचे सह आयुक्त बन्सी गवळी, उपजिल्हाधिकारी रामदास जगताप,नोंदणी उपमहानिरीक्षक दीपक सोनवणे, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे उप महानिदेशक अजय जोशी या वेळी उपस्थित होते.