जंगली महाराज रस्त्यावरील महिलांसाठी ई-टॉयलेट्सचा पुरुषांकडून वापर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांतील अस्वच्छता आणि त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत असतानाच मोठा गाजावाजा करून महिलांसाठी उभारण्यात आलेल्या ई-टॉयलेट्सच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे. जंगली महाराज रस्त्यावरील महिलांसाठी असलेल्या ई-टॉयलेट्सचा वापर पुरुषांकडून होत असल्याचे दिसून आले आहे.

शहरातील स्वच्छतागृहांची उभारणी महापालिकेकडून होते. मात्र तेथील अस्वच्छता, मूलभूत सुविधांचा अभाव, त्यांची देखभाल दुरुस्ती हे प्रश्न सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे पूर्णपणे यांत्रिकी व स्वयंचलित पद्धतीवर आधारित स्वच्छतागृहे उभारण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले. खासदार अनिल शिरोळे यांच्या विकास निधीतून शहरात अकरा ठिकाणी चौदा ई-टॉयलेट्स उभारण्याचा प्रस्ताव असून त्या अंतर्गत जंगली महाराज रस्त्यावरील ई-टॉयलेटची सुविधा गेल्या महिन्यात उपलब्ध करून देण्यात आली. नवी मुंबईच्या धर्तीवर शहरात ई-टॉयलेट्सची उभारणी करण्यात आली असून स्वयंचलित प्रणाली, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा या स्वच्छतागृहांमध्ये आहेत. मात्र आता या टॉयलेट्सचा वापर पुरुषांकडूनही होण्यास सुरुवात झाली आहे. जंगली महाराज रस्त्यावरील छोटय़ा-मोठय़ा विक्रेत्यांकडून महिलांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांचा सर्रास वापर होत आहे.

या पद्धतीने उभारण्यात येणारी स्वच्छतागृहे महिलांसाठी आहेत. पण त्यांचा वापर पुरुषांकडून होत असूनही महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे तिकडे दुर्लक्ष झाले आहे.

स्वच्छतेला प्राधान्य

मानवविरहित स्वच्छता आणि स्वयंचलित प्रणाली ही या स्वच्छतागृहांची वैशिष्टय़े आहेत. स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी नाणे (कॉईन) टाकल्यानंतरच त्याचा वापर करता येतो. स्वच्छतागृहाचा वापर झाल्यानंतर तत्काळ त्याची साफसफाई यंत्राद्वारे होते. साफसफाई झाल्याशिवाय त्याचा वापर करता येत नाही. त्यामुळे तेथे स्वच्छता राहते. देशातील अनेक  शहरांत या पद्धतीचा अवलंब होत असून पुण्यात प्रथमच अशी स्वच्छतागृहे उभारली जात आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र रॅम्प आणि लोखंडी बारचीही व्यवस्था आहे.

स्वच्छतागृहांची दुरवस्था, अपुरी संख्या

शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि त्यांची दुरवस्था हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्याही कमी असून स्वच्छतागृहांच्या उभारणीचे निकषही पाळले जात नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. सध्या पाचशे व्यक्तींमागे एक असे शहरातील स्वच्छतागृहांचे प्रमाण असून महिला स्वच्छतागृहांचे प्रमाण त्यापेक्षा खूप कमी आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची ही वस्तुस्थिती ‘लोकसत्ता’ने सातत्याने मांडली

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: E toilets unsafe for women
Show comments