पिंपरी : चिंचवड शहरात वर्षभर ई-कचरा संकलन अभियान राबविण्यात येणार आहे. घातक कचरा संकलित करून त्याचा पुनर्वापर व शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेच्या भोसरीतील ई-वेस्ट सेंटर येथे ई-कचरा संकलन व्हॅनच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क विभागप्रमुख रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, ईसीएच्या विनिता दाते, डॉ. आशा राव, नताशा गांगल, हिरामण भुजबळ यांच्यासह ग्रीनस्केपचे प्रमुख रुपेश कदम उपस्थित होते.

हेही वाचा – चिंचवड पोटनिवडणुकीतील प्रभागनिहाय मतदान ठरविणार महापालिका इच्छुकांचे भवितव्य

हेही वाचा – म्हाडाच्या सोडतीला यंदा कमी प्रतिसाद, ऑनलाइन प्रणालीचा परिणाम

महापालिका, ग्रीन स्केप आणि ईसीए यांच्या संयुक्त विद्यमाने ई-वेस्ट रिसायकलिंग, प्लास्टिक रिसायकलिंग कम हॅबी सेंटरच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. या उपक्रमाची रूपरेषा आयुक्त सिंह यांनी समजावून घेत सूचना केल्या. त्याची अंमलबजावणी करून लवकरच संपूर्ण शहरात वर्षभर कायमस्वरुपी ई-कचरा संकलन अभियान राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: E waste collection campaign to be implemented in pimpri throughout the year pune print news ssb
Show comments