भूकंपाच्या सौम्य धक्क्य़ाने शिवाजीनगर ते दिघी परिसराला मंगळवारी सकाळी ६ वाजून २४ मिनिटांनी हादरा बसला. रिश्टर स्केलवर ३ अशी नोंद झालेल्या या भूकंपाने या परिसरातील नागरिकांची साखरझोप उडाली.
दिघी, भोसरीचा काही भाग, विश्रांतवाडी, शिवाजीनगरचा काही भाग या परिसरातील रहिवाशांना भूकंपाचा धक्का चांगलाच जाणवला. भोसरी रेडझोन परिसरात लष्कराच्या वतीने दारूगोळ्याचा सराव केला जातो. या सरावामुळे भोसरी, दिघी परिसरात वारंवार हादरे जाणवत असतात. मात्र, नेहमी जाणवणाऱ्या हादऱ्यापेक्षा मंगळवारी वेगळ्या स्वरूपाचा हादरा जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. पुणे वेधशाळा आणि महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला यासंदर्भातील माहिती कळविण्यात आली. त्यानंतर हा भूकंपाचाच धक्का असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिघी ते शिवाजीनगर या परिसरात प्रथमच भूकंपाचा केंद्रिबदू आढळून आला आहे. जमिनीखाली पाच किलोमीटर अंतरावर हा केंद्रिबदू होता. उथळ स्वरूपाच्या या भूकंपाचे भौगोलिक स्थान १८.५ उत्तर अक्षांश आणि ७३.८ पूर्व रेखांश होते, अशी माहिती िपपरी-चिंचवड महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ओमप्रकाश बहिवाल यांनी दिली. सौम्य स्वरूपाच्या या भूकंपामुळे कोठेही पडझड झाली नाही. त्याचप्रमाणे घराला तडे गेल्याचेही आढळून आले नाही, असेही बहिवाल यांनी स्पष्ट केले.                                                                                                        (संग्रहित छायाचित्र)

Story img Loader