‘सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही तर गावाचा पाणीपुरवठा तोडून टाकेन..’, बारामती लोकसभा मतदारसंघातील मुर्टी-मासाळवाडी गावातील मतदारांना दिलेली ही धमकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भोवण्याची चिन्हे आहेत. बारामतीतील आम आदमी पक्षाचे उमेदवार सुरेश खोपडे यांनी याप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली असून राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना या संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांची पाठराखण करत त्यांच्या बदनामीचा हा कट असल्याचा आरोप केला आहे.
मुर्टी-मासळवाडी गावात अजित पवार यांची १६ एप्रिलला सभा झाली. त्यात ग्रामस्थांनी पाणीप्रश्नासंदर्भात विचारले असता पवार यांनी ग्रामस्थांना सुप्रिया सुळे यांच्या बाजूने मतदान न केल्यास गावाचा पाणीपुरवठा तोडून टाकण्याची धमकी दिली. सुरेश खोपडे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल करताना पवार यांच्या भाषणाची ध्वनिफीत पोलिसांकडे सादर केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा