आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर शुक्रवारी (५ जानेवारी) सकाळी सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीची तपासणी सुरू केली असून कंपनीचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. आमदार रोहित पवार यांची ही कंपनी आहे.
अजित पवार हे राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पवार कुटुंबात उभी फूट पडली आहे. त्यानंतर आमदार रोहित पवार यांच्या कंपन्यांना सातत्याने केंद्रीय आणि राज्यातील यंत्रणांकडून लक्ष्य केले जात आहे.
हेही वाचा : दिल्ली, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी ईडी समन्स नाकारले, आता केजरीवाल आणि सोरेन यांना अटक होणार?
दरम्यान या प्रकरणी कंपनी प्रशासनाकडून कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. केंद्रीय तपास यंत्रणांकडूनही अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.