पुणे:  आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. त्या कारवाईसंदर्भात आमदार रोहित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रशांत जगताप या वेळी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित पवार म्हणाले, की कोणत्याही एफआयआरमध्ये माझे आणि बारामती ॲग्रोचे नाव नाही. दोन वर्षं ईडीने कारवाई केली नाही. १९ जानेवारीला मला नोटिस आली आणि ईओडब्ल्यूने २० जानेवारीला क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. त्यात क्लिन चीट देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ राजकीय द्वेषातून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.  ८ मार्च रोजी बारामती ॲग्रोला प्रेस नोटद्वारे नोटीस आली. ही प्रेस नोट चुकीची आहे. अशीच प्रेस नोट जरंडेश्वरच्या प्रकरणातही आली होती. ही प्रेस नोट कट कॉपी पेस्ट केलेली आहे. त्यामुळे या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असे रोहित पवार यांनी सांगितले.  

हेही वाचा >>>राजकारण सोडून घरी बसेन; पण शिवाजीराव आढळरावांना विरोधच! कोणत्या नेत्याने मांडली भूमिका?

आम्ही जास्त पैसे देऊन साखर कारखाना घेतला. या व्यवहारात काहीही चुकीचे झालेले नाही. आम्ही सगळी माहिती ईडीला दिलेली आहे. आमच्यावर ठेवलेले आरोप पीएमएलएमध्ये बसत नाही. बारामती ॲग्रोमध्ये काळा पैसा नाही, घामाचा पैसा आहे. त्यामुळे मी लढणार आणि जिंकणार आहे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी पक्ष फोडून, पक्ष चोरी करून सत्तेत गेले. मी लोकांसाठी सरकारशी संघर्ष करत असल्याने माझ्यावर कारवाई सुरू झाली, असे रोहित पवार यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला दोन-तीन महिने जेलमध्ये टाकले जाऊ शकते. त्यामुळे आता लढावे लागणार आहे. काही लोकांनी स्वाभिमान गहाण ठेवला असला, तरी मी संघर्ष करत राहणार आहे, असेही रोहित पवार म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed has taken action against mla rohit pawar company baramati agro pune print news ccp 14 amy