पुणे : शिक्षक भरती पात्रता परीक्षा (टीईटी), म्हाडा तसेच आरोग्य भरती परीक्षा प्रकरणातील तपासाची कागदपत्रे सक्तवसुली अंमलबजावणीने संचनालयाकडून (ईडी) गैरव्यवहार प्रकरणाचा समांतर तपास केला जाणार आहे. गैरव्यवहार प्रकरणाची तपासाची कागदपत्रे ईडीकडून पुणे पोलिसांकडून मागविण्यात आली आहे.

टीईटी, म्हाडा, आरोग्य भरती गैरव्यवहार प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेकडून करण्यात आला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त भाग्यश्री नवटके आणि सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला होता. या प्रकरणात उच्चपदस्थ अधिकारी तसेच गैरव्यवहार प्रकरणात गुंतलेल्या दलालांना अटक करण्यात आली होती. गैरव्यवहार प्रकरणात काळ्या पैशांचे हस्तांतरण झाल्याचा संशय असून ईडीकडून या प्रकरणाचा समांतर तपास केला जाणार आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासाची कागदपत्रे ईडीने मागवून घेतली आहे, असे सायबर गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.