पुणे : पिंपरीतील दी सेवा विकास बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात माजी संचालक, माजी उपमहापौर अमर मुलचंदानी, रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय आरहाना तसेच सागर सूर्यवंशी, खेमचंद भोजवानी आणि त्यांच्या कुटुंबीयांची १२१ कोटी रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) जप्त करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोझरी स्कूलचे संचालक विनय आरहाना, विवेक आरहाना यांच्या विरुद्ध काॅसमाॅस बँकेची २० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी आरहाना यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीकडून समांतर तपास करण्यात आला होता. ईडीने २८ जानेवारी रोजी आरहाना यांच्या मालमत्तेवर छापे टाकून त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर ईडीकडून विनय आरहाना यांना दहा मार्च रोजी अटक करण्यात आली होती.

हेही वाचा >>> पुणे : पाळीव श्वानाच्या पिलाला चप्पलेने मारहाण करणे पडले महागात 

पिंपरीतील सेवा विकास बँकेचे माजी संचालक अमर मुलचंदानी यांच्या विरुद्ध ईडीने २८ जानेवारी रोजी कारवाई केली होती. कर्ज प्रकरणात मुलचंदानी तसेच अन्य संचालकांनी ४२९ कोटी सहा लाख रुपयांचा गैरव्यवहार प्रकरणी मुलचंदानी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या निवासस्थान तसेच कार्यालयावर ईडीने छापे टाकले होते. ईडी कारवाईस विरोध करुन अधिकाऱ्यांना असहकार्य केल्या प्रकरणी मुलचंदानी यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी मुलचंदानी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या विरुद्ध ईडीने स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता. मुलचंदानी यांनी बेकायदा कर्जमंजूर करुन गैरव्यवहार केला होता. रोझरी स्कूलचे विनय आराहाना, सागर सूर्यवंशी, खेमचंद भोजवानी यांनी दी सेवा विकास बँकेकडून कर्ज घेतले होते. मुलचंदानी याने केलेल्या गैरव्यवहार आराहाना, सूर्यवंशी, भोजवानी सामील असल्याचे ईडीच्या तपासात उघडकीस आल्यानंतर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ईडीने मुलचंदानी यांची पिंपरीतील तसेच आरहाना, सूर्यवंशी, भोजवानी यांची १२१ कोटी ८१ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed seized amar mulchandani vivek aranha along with 4 assets worth rs 121 crore pune print news rbk 25 zws