खाद्यतेल खरेदीसाठी साडेआठ कोटी रुपये देऊन माल न पुरविता फसवणूक केल्या प्रकरणी एका व्यापाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मार्केट यार्डातील खाद्यतेल व्यापाऱ्याने तक्रार दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या प्रकरणी राज ललित बकोरिया (रा. शीतल प्लाझा, माॅडेल काॅलनी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश नरेंद्र मित्तल (रा. मुकुंदनगर, स्वारगेट) यांनी या संदर्भात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मित्तल मार्केट यार्डातील भुसार बाजारात खाद्यतेल विक्रीचा व्यवसाय करतात. मित्तल यांनी खाद्यतेल खरेदीसाठी बकोरिया यांना गेल्या वर्षी आठ कोटी ५४ लाख रुपये दिले होते. रक्कम अदा केल्यानंतर बकोरिया यांनी मित्तल यांना खाद्यतेलाचा पुरवठा केला नाही. त्यानंतर मित्तल यांनी त्यांच्याकडे पैसे परत मागितले होते. बकोरिया यांनी त्यांना पैसे परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मित्तल यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. मार्केट यार्ड पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.