पुणे : जिल्हा परिषद शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यावरून सध्या शिक्षण विभागावर टीकेची झोड उठली आहे. असे असताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रस्तावित शिक्षक भरतीबाबतची माहिती पुण्यात दिली. राज्यात शिक्षकांची पन्नास हजार पते भरली जाणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
केसरकर म्हणाले, की जिल्हा परिषद, अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती होणार आहे. राज्यात ५० हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. त्यात ३० हजार पदे पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या भरतीत २० हजार शिक्षकांची भरती होणार आहे. ही भरती होईपर्यंतच निवृत्त शिक्षकाकडून काम करून घेतलं जाणार आहे. भरती प्रक्रियेला विलंब झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा >>>तलाठी भरती : ४६४४ जागांसाठी तब्बल चार लाख अर्ज
हेही वाचा >>>पुणे, पिंपरी-चिंचवडमधील ९६ आधार केंद्रे बंद; नागरिक हैराण
शाळात विद्यार्थी किती असतात यावर नियंत्रण नसते. त्यामुळे सर्व शाळांवर आता कॅमेरे लावले जातील, असेही केसरकर म्हणाले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणासाठीही काम केलं आहे. महाराष्ट्राचे मॉडेल देशात वापरले जात असल्याचे केसरकर यांनी सांगितले.