पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवड शहरात ईद निमित्त अनेक फलक लावण्यात आले आहेत. पैकी काही फलकांवर छोटा रावण टोळीचा प्रमुख कुप्रसिद्ध सरफराज ताज शेख उर्फ छोटा रावण उल्लेख असलेले फलक लावण्यात आले होते. याबाबत ची माहिती दापोडी पोलिस आणि महानगर पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाला मिळताच त्यांनी फलक काढून कारवाई केली आहे. याबाबत दापोडी पोलिसात तक्रार देण्यात आली असून कालिदास जगन्नाथ शेळके यांनी फिर्याद दिली आहे. ते आकाश चिन्ह आणि परवाना विभागाचे प्रमुख आहेत.
अवघ्या देशभर मोठ्या उत्साहात ईद साजरी केली जात आहे. पिंपरी- चिंचवड शहरात देखील मोठा उत्साह आहे. शहरात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त देखील वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. सध्या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड पोलीस सतर्क आहेत.
ईद निमित्त पिंपरी- चिंचवड शहरातील अनेक भागात फलक लावण्यात आले आहेत. कासारवाडी भागात देखील ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत. परंतु, रावण टोळीचा प्रमुख असलेला छोटा रावण च्या नावाने फलक लावण्यात आल्याने खळबळ उडाली. कुप्रसिद्ध असलेला सरफराज शेख उर्फ छोटा रावण चा फोटो वापरून ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती महानगरपालिकेचे आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे प्रमुख कालिदास जगन्नाथ शेळके यांच्यासह दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कासारवाडी मधील आठ ते दहा फलक काढून टाकण्यात आले आहेत. याबाबत रीतसर दापोडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
सरफराज शेख उर्फ छोटा रावण याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तो रावण टोळीचा मोरक्या आहे. अशा प्रकारचे फलक लावल्याने गुन्हेगाराचे उदातीकरण होत असल्याचा सूर नागरिकांमध्ये उमटत होता. अखेर महानगरपालिका आणि दापोडी पोलिसांनी कारवाई करताच कासारवाडीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केल आहे. ‘ह’ प्रभागामध्ये अनधिकृत फलक लावणाऱ्या १६ जणांवर गुन्हे दाखल करत १४ लाखांचा दंड केला आहे. अशी माहिती आकाश चिन्ह परवाना विभागाचे कालिदास जगन्नाथ शेळके यांनी माहिती दिली आहे. दापोडी पोलीस ठाण्याच्या आवारात अशा प्रकारची गुंडगिरी आणि गुन्हेगारांच उदातीकरण खपवून घेतलं जाणार नाही. असा इशारा दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे यांनी दिला आहे.