वैभवाशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता शुक्रवारी (९ सप्टेंबर) दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. विसर्जन सोहळ्यासाठी आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गावरून मिरवणूक जाणार आहे. मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पाेलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहर तसेच उपनगरात साडेआठ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळपासून शहरात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : गणेश विसर्जनासाठी महापालिकेची तयारी पूर्ण

विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत शहर तसेच उपनगरात पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपीएफ), गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तास राहणार आहेत.विसर्जन मार्गावरील दागिने, मोबाइल संच हिसकावणे तसेच छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस गस्त घालणार आहेत. नागरिकांसाठी मदत केंद्र राहणार आहे. चौकाचौकात निरीक्षण मनोरे उभे करण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

हेही वाचा >>> शिक्षकांची छायाचित्रे भितींवर लावण्याचा निर्णय मागे ; विरोधानंतर मध्यममार्ग; आता माहिती परिचय फलकावर

शहरात वाहतूक बदल

शहराच्या मध्य भागातील प्रमुख रस्ते तसेच उपरस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. आपत्कालिन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचण्यासाठी त्वरित मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीत संशयित व्यक्ती किंवा बेवारस वस्तू आढळल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्षात किंवा बंदोबस्तावरील पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. बंदाेबस्तात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह साडेआठ हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत.– आर. राजा, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा

दृष्टिक्षेपात बंदोबस्त
पोलीस उपायुक्त १०

सहायक पोलीस आयुक्त २३
पोलीस निरीक्षक १३८

सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक ६२५
पोलीस कर्मचारी ७,७४२

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight and a half thousand policemen are deployed for the immersion procession pune print news amy