चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याला आणखी आठ दिवस विलंब लागण्याची शक्यता आहे.या ठिकाणच्या विविध सेवावाहिन्या स्थलांतर करण्याचे काम रखडले आहे. पूल पाडण्याआधीची पूर्वतयारी संबंधित खासगी कंपनीकडून अंतिम टप्प्यात आहे.चांदणी चौकातील कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याचे नियोजन केले आहे. दिल्ली येथील कंपनीकडून त्याचे काम केले जात आहे. सध्या पूल पाडण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे. मात्र,या ठिकाणच्या विविध सेवावाहिन्या स्थलांतर करण्याचे काम रखडले आहे. पुणे महापालिकेकडून त्यांच्याकडील बहुतांश सेवावाहिन्या काढण्यात आल्या आहेत. मात्र, अन्य सेवावाहिन्या स्थलांतरित करण्याबाबत महापालिकेलाच विनंती करण्यात आली आहे. या कामासाठी विलंब होत आहे. तर, दुसरीकडे जोवर सेवावाहिन्या स्थलांतरित करण्यात येत नाहीत, तोवर पूल पाडता येणार नसल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) स्पष्ट करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा