लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिकेची आठही रुग्णालये समाविष्ट करण्यात आली आहेत. तीन वेगवेगळ्या गटांमध्ये या रुग्णालयांचा समावेश केला आहे. त्यानुसार, संबंधित रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.

Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
elderly woman rescued by fire brigade after being trapped in flat
सदनिकेत अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुटका- बेशुद्धावस्थेतील महिलेवर त्वरीत उपचार केल्याने अनर्थ टळला
Balu Dhanorkar mother, Vatsala Dhanorkar claim,
खळबळजनक! खासदार बाळू धानोरकरांचा घातपात, आईच्या दाव्याने शंका कुशंका
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
swargate police file case against three for gang rape of woman by threatening to kill children
मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामुहिक बलात्कार; स्वारगेट पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

केंद्र शासनाच्या सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमात प्रसूतीविषयक मूलभूत काळजी (सुमन बेसिक) या गटामध्ये पिंपरीतील जिजामाता रुग्णालय, आकुर्डी रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय, सांगवी रुग्णालय आणि नवीन थेरगाव रुग्णालय यांचा समावेश केला आहे, तर मूलभूत तातडीची प्रसूतीविषयक काळजी (बी मॉक) या प्रकारात नवीन भोसरी रुग्णालय आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (तालेरा रुग्णालय) यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, व्यापक तातडीची प्रसूतीविषयक काळजी (सी मॉक) या प्रकारात महापालिकेच्या पिंपरी- संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे.

आणखी वाचा-पुणे विमानतळाबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा

बाळ जन्मल्यापासून पुढील महिनाभराच्या कालावधीसाठी लागणारी वैद्यकीय सेवा मोफत दिली जाते. बाळाचे सर्व लसीकरण मोफत केले जाते. महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात आणताना आणि घरी सोडताना मोफत रुग्णवाहिका सेवा, रुग्णालयामध्ये सर्वसाधारण प्रसूतीसाठी तीन दिवस, तर शस्त्रक्रियेद्वारे झालेल्या प्रसूतीसाठी (सिझेरियन डिलिव्हरी) सात दिवसापर्यंत महिलांना अन्न मोफत दिले जाते. महिलांच्या प्रसूतीनंतर पुढील ४२ दिवसांपर्यंत आशा वर्कर माहिती घेत राहतात. महिलांना जननी शिशु सुरक्षा योजनेचे देखील फायदे मिळतात. सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमात सर्व गरोदर माता, सहा महिन्यांपर्यंतच्या स्तनदा माता, तसेच सर्व आजारी बालके यांचा समावेश केला आहे. माता व बालकांना नऊ गुणात्मक सेवा उपलब्ध करून देण्याची हमी या कार्यक्रमात देण्यात आली आहे. तसेच, या कार्यक्रमांतर्गत सर्व सेवा बंधनकारक आणि मोफत देण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या आठही रुग्णालयांमध्ये सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रम राबविला जात आहे. विविध विभागांमध्ये ही रुग्णालये समाविष्ट केली आहे. या कार्यक्रमांतर्गत रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी दाखल माता आणि जन्मलेल्या बाळाची काळजी घेतली जात आहे. -डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका