पुणे : बनावट शस्त्र परवाना बाळगून सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या आठजणांना वानवडी पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून जम्मू काश्मीर येथून बनावट शस्त्र परवाना मिळवल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, १२ बोअरची बंदूक, ५६ काडतुसे, तीन बनावट शस्त्र परवाने असा सहा लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संतोष जैनाथ शुक्ला (वय ५० रा. भागीरथी नगर, साडेसतरा नळी, हडपसर, मूळ रा. प्रयागराज, उत्तरप्रदेश), रामप्रसाद बुध्दा पासवान (वय ३५, रा. भिंगारवाडी, ता. पनवेल, जि. रायगड, मूळ रा. फतेहपूर उत्तरप्रदेश), राजेश बबलू पासवान (वय ३५ रा. फतेहपूर, अशोकनगर, उत्तरप्रदेश), दिनेश जगदीश पासवान (वय ५४ रा. गोपीपूर, उत्तरप्रदेश), इम्रान मोहमद जिमी खान (वय ३० रा. राजोरी, जम्मूकाश्मिर), मोहंमद बिलाल मोहंमद निसार (३० रा. मंजापूर, जम्मू काश्मिर जम्मू काश्मिर), साहिलकुमार चमनलाल शर्मा (वय २५ रा. राजोरी, जम्मू काश्मिर), गीतम देशराय शर्मा (वय २३, रा. राजोरी, जम्मू काश्मिर) अशी अटक करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांची नावे आहेत.

nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune four pistols and two bikes seized
कोंढव्यात तिघांकडून चार पिस्तुले, दोन दुचाकी जप्त
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
terrorist 44 killed during the year in jammu region
जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार

हेही वाचा – पिंपरी चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना, जलतरण तलावात क्लोरीन गॅस गळतीमुळे काही जण बेशुद्ध

हडपसर भागातील रामटेकडी परिसरात जुलै महिन्यात संतोष शुक्ला याला गस्त घालणाऱ्या वानवडी पोलिसांच्या पथकाने पकडले होते. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले होते. पाेलिसांनी त्याची चौकशी केली. तेव्हा साथीदारांकडे बंदूक असल्याची माहिती त्याने दिली. साथीदारांकडे शस्त्र परवाना आहे, असेही त्याने पोलिसांना सांगितले होते. तळेगाव दाभाडे परिसरातील टोलनाक्यावर काम करत असणाऱ्या सुरक्षारक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या शस्त्र परवान्याबाबत चौकशी करण्यात आली. तेव्हा शस्त्र परवान्यावर जम्मू काश्मीरमधील जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी असल्याचे उघडकीस आले.

हेही वाचा – शरद पवार यांची दसऱ्याला पुण्यात सभा?

पोलिसांनी आरोपींच्या घराची तपासणी केली. त्यांच्याकडून १२ बोअरची बंदूक, ५६ काडतुसे, तीन बनावट शस्त्र परवाने जप्त करण्यात आले. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.