पुणे : गोमांसची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग किवळे येथे ही कारवाई करण्यात आली. आठ टन गोमांसासह २७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

टेम्पोत पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कांदा-बटाट्याच्या गोणी ठेवण्यात आल्या होत्या. या गुन्ह्याबाबत गोरक्षक शिवशंकर राजेंद्र स्वामी यांनी देहूरोड पोलिसात तक्रार दिली आहे. टेम्पोचालक दीपक रफिक पैगंबर आणि टेम्पोमालक शौकत हुसेन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पैकी, दीपकला अटक करण्यात आली आहे.

Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
Maharashtra no minimum support price
शेतीमालाला हमीभाव नाहीच, जाणून घ्या, हमीभाव किती, मिळणारा दर किती
pune puram chowk loksatta
पुणे : पूरम चौकात १६ लाखांचा गुटखा पकडला, टेम्पोचालकाला अटक
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Police raid unauthorized bar in Ghatkopar and rescue eight bar girls Mumbai news
घाटकोपरमध्ये अनधिकृत बारवर पोलिसांचा छापा; आठ बारबालांची सुटका

हेही वाचा – पुणे: बाणेरमधील हाॅस्पिटलमधून अमेरिकन डॉलरसह ४ लाख ८२ हजार चोरले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास खासगी टेम्पोतून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून मुंबईला गोमांस घेऊन जाणार असल्याची माहिती गोरक्षक शिवशंकर राजेंद्र स्वामी यांना मिळाली. देहूरोड पोलीस आणि गोरक्षक यांनी तो टेम्पो किवळे येथे सापळा लावून पकडला. टेम्पोच्या आत कांदा आणि बटाट्याच्या गोणी होत्या. मग, आतमध्ये गव्हाचा भुसा असलेल्या पन्नास गोणी आढळल्या. त्याखाली आठ टन गोमांस सापडले. धाराशिव येथून मुंबईला हे गोमांस घेऊन जात असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

हेही वाचा – पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्यास नळजोड तोडणार; पिंपरी- चिंचवड महापालिकेचा इशारा

टेम्पोचालक दीपक आणि टेम्पोमालक शौकतच्या विरोधात भा.दं.वि.कलम ४२९ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५ (क) , ९(अ) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी, दीपकला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.