बारामती : काही व्यक्ती खरीच ध्येयवेडी असतात, बारामतीतील एकनाथ देशमाने या सायकलपटूने गुवाहाटी ते कोचिन पर्यंतचा प्रवास एकट्याने सायकल वरून पूर्ण केला. साधारण चार हजार आठशे पन्नास किलोमीटरचे हे अंतर दोन महिन्याच्या दरम्यान त्यांनी पूर्ण केले.

दैनिक लोकसत्ताशी बोलताना देशमाने यांनी सांगितले,” सायकलवरून प्रवास करण्याची मला प्रचंड आवड आहे, यापूर्वी सुद्धा मी अनेक ठिकाणी सायकलवरून प्रवास केला आहे, अष्टविनायक यात्रा सायकलवरूनच पूर्ण केली, संपूर्ण महाराष्ट्राची यात्रा सुद्धा मी एकट्यानी सायकल वरूनच केली, त्याचबरोबर काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवास सुद्धा मी सायकल वरूनच केला आहे, आणि आता गुवाहाटी ते कोचिन या सायकल प्रवासाची सांगता आज गुरुवारी केली,

एकनाथ देशमाने यांनी सांगितले की, सायकलवरून प्रवासाची सुरुवात गुवाहाटी – कुचबीहार – बोको – जलपायगुडी – सिलिगुडी – रायगांज – पूर्णिया – मालदा – फारक्का – मुर्शिदाबाद – पोलसंडा – हजार द्वार- कृष्णानगर – वर्धमान – कोयला घाट – खडागपूर – बलाश्वर – सोरो – भद्रक – चांदिखोल – कांतपदा – निर्मल पडा – गोप – कोणार्क ( सूर्य मंदिर ) नागपुर – नरडी साई – जगन्नाथ पुरी – धनकुनी – बळुगौव – खलिकोट – चात्तरपुर – सोंपेता – कोलम – कोरणपल्ली – वादिगव – पलासा – टेक्कली – कोटपोमल्ली – नियमन – श्रिकाकुलम – छिलका पल्ली – मिरीमावरं – पुष्पत्रेगा – भगापुलवसा – अनंद वरम – सहेबमिर्झा – कझिकोटा – तुल्लापलेम – श्रिधर्मावरं – आन्नावरं – रजमंद्री – खम्माम – कोडद – हुसैन सागर – सुर्यापेट – मरकंपुर – नगरकरणूल – करणूल – धोन – अनंतपूर – कडीरी – मुळकलम्पेता – बथल पल्ली – आंगल्लु – तिरुपती – तिरुमला – चित्तूर – हुस्सुर – बाठलपल्ली ( हुडको ) – कृष्णगिरी – कावेरीपत्तन – करीमंगलम – धर्मापुरी – थोप्पुर – कानेरी – अंगडपेता – कोंडा मलेपल्ली – पांडपल्ली – इडगुद्दी – कुमरपायलम – भवानी – लक्ष्मीनगर – बायपास – एरोड – त्रिप्पुर – अविनाशी – कोइंबतूर – वालायार – पलक्कड – काकाकोलंपत्ती – पलघट – त्रिशूर – एर्नाकुलम – अल्लाप्पी – कोचीन असे विविध राज्यातून साधारणता ४८५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला.

एकट्याचा या सायकल प्रवासा दरम्यान समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मुक्कामी गाठीभेटी घेत मी जनजागृतीची मोहीम सुद्धा राबवली, अंमली आणि विविध नशेचे पदार्थाचे सेवन करू नका, देशातील वाढत्या वाहन प्रदूषणाचे निर्मूलन करण्यासाठी सायकलचा सर्वाधिक वापर करा, वाहतुकीचे नियमाचे पालन करा, अपघातग्रस्त लोकांना मदत करा, वाहतुकीचे नियमाचे पालन करून आपला प्रवास सुरक्षित पद्धतीने करा, सुरक्षित प्रवास करून आपल्या घरी पोहोचा, आपल्या घरची आपल्या कुटूंबातील सदस्य वाट पाहत असतात, असा सामाजिक संदेशही त्यांनी ठिकाणच्या भेटी प्रसंगी दिला.

देशमाने यांच्या सायकल प्रवासामध्ये विविध ठिकाणच्या पोलीस ठाण्यातील पोलिसांनी योग्य ते मार्गदर्शन आणि माहिती देऊन सहकार्य केले, या सायकल प्रवासामध्ये अनेकांनी आर्थिक आणि सामाजिक स्वरूपाची मदत सुद्धा केली, सायकल प्रवासा दरम्यान मोबाईल वरील व्हाट्सअप, फेसबुक हया समाज माध्यमाच्या मदतीने घरातील आणि मित्र नातेवाईक अनेकांशी संपर्कात सुद्धा राहिलो. प्रवासामध्ये अनेक ठिकाणी चांगल्या वाईट अनुभव सुद्धा मिळाले. अशी ही माहिती देशमाने यांनी सांगितली.