पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जेल की भाजप असा पर्याय दिला होता. त्यांचे पैशाचे गोडाऊन सापडले होते. आयकर विभागाची धाड पडली होती. भाजपसोबत येताय की जेलमध्ये टाकू असे सांगितले होते. त्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्याकडे आले आणि भाजपवाले मला धमकावत आहेत. जेलमध्ये जाण्याचे माझे वय नाही. मला हे आत टाकतील. भाजपसोबत चला  अशी विनवणी करत होते. अटकेच्या भीतीनेच शिंदे आणि ४० गद्दार भाजपसोबत गेले असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. 

मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे  उमदेवार संजोग वाघेरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला.  काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे,  शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील, आमदार रोहित पवार, संजय जगताप, सचिन अहिर यावेळी उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या वज्रमूठ सभा पार पडली.

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

हेही वाचा >>> मुळशीतील मुठा गावात थरार ; गुंड नवनाथ वाडकरकडून पोलिसांवर गोळीबार

आदित्य ठाकरे म्हणाले, की नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. इतिहास घडणार  आणि देशात परिवर्तन घडणार आहे. अब की बार, भाजप तडीपार ही घोषणा सर्वत्र ऐकू येत आहे. भाजपला तडीपार करायचे आहे. भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांवर चिखलफेक केली जात आहे. चिखल फेकल्यानंतर भाजपमध्ये घेऊन धुवून काढत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी भाजपसोबत येण्यास नकार दिल्याने त्यांना कारागृहात टाकले. सत्तामेव जयतेसाठी भाजप लढत आहेत. शिंदे यांना जेल की भाजप असा पर्याय दिला होता. त्यांचे पैशाचे गोडाऊन सापडले होते. आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे आले आणि भाजपसोबत जाऊ म्हटले. या वयात मी जेलमध्ये जाऊ शकत नाही म्हटले. अटकेच्या भीतीनेच शिंदे आणि ४० गद्दार भाजपसोबत केले. देशातील जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे. शेतमालाला भाव नाही. शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. गॅस, पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी भाजप सरकारने लाठीहल्ला केला. शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटले जाते, हे दुर्देव आहे. अशा सरकारला घरी बसविण्याची वेळ आली आहे. सगळे प्रकल्प गुजरातला पाठविले जात आहेत. रांगोळी गुजरातला आणि महाराष्ट्राची राख करत आहेत. मंत्री महिला खासदारांना शिव्या देत आहेत. गुंड मंत्रालयात जाऊन रिल्स करत आहेत. गुंड नेत्यांच्या मुलांना भेटत आहे, अशा सरकारकडून जनतेला न्याय मिळेल का? असा सवाल ठाकरे यांनी केला.

हेही वाचा >>> मावळ : मुलाला एक कोटी कर्ज, पत्नीला ९७ लाख ‘हातउसने’, संजोग वाघेरेंची किती आहे संपत्ती…

आचारी कोण आणि वाढपी कोण?

शिरूरचा किल्ला सुरक्षित आहे. त्यामुळे मी मावळमध्ये आलो आहे. शहराच्या विकासाच्या बाबतीत आचारी कोण होता आणि वाढपी कोण होता, हे नागरिकांना माहिती आहे. महागाई, बेरोजगारी नष्ट करण्यासाठी बळकट हाताने मशाल पेटवायची आणि विजयाची तुतारी फुकांयची आहे. ही निवडणूक स्वाभिमानाची आहे. त्यामुळे नाराजी विसरून कामाला लागावे. गद्दारी गाडण्यासाठी मशाल प्रज्वलित करावी, असे आवाहन खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केले.

विदर्भातील पाचही जागा महाविकास आघाडी जिंकेल

माणिकराव ठाकरे म्हणाले, की पहिल्या फेरीत विदर्भात मतदान झाले असून पाचही जागा महाविकास आघाडी जिंकेल. अशीच परिस्थिती राज्यात राहील. भाजपने जाती, धर्माच्या नावाने राजकारण सुरू केले आहे. इंडिया आघाडी देशात सत्तेत येईल. शरद पवार यांनी ज्यांना मोठे केले, तेच लोक त्यांच्या विरोधात बोलत आहेत. त्यांच्यावर शाब्दिक हल्ले केले जात आहेत. भाजपने कटकारस्थान करून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फोडले. चिन्ह गद्दाराना दिले. याच्या वेदना जनतेला होत आहेत. त्यामुळे जनता परिवर्तन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 

स्वाभिमानी नागरिक गद्दारीला धडा दाखवतील

रोहित पवार म्हणाले, की मावळमध्ये परिवर्तन होईल. छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे. या भूमीने स्वाभिमान राखला आहे. त्यामुळे स्वाभिमानी नागरिक गद्दारीला धडा दाखवतील. ही विचारांची लढाई आहे. गद्दाराला धडा शिकवायचा आहे. भाजपला त्यांची जागा दाखवायची आहे. चिंचवड मधील पोटनिवडणुकीत महायुतीचे नेते एकमेकांविरोधात बोलत होते. आता सोईच्या राजकारणासाठी भाजपसोबत जाऊन बसले आहेत. २०१९ मध्ये माझ्या भावाचा पराभव झाला. त्याचा पराभव करणाऱ्या बारणे यांचा अर्ज भरण्यासाठी अजित पवार आले. पण, या पराभवाचा बदल घेऊन बारणे यांना हद्दपार करणार आहे. तीन लाख मतांच्या फरकाने वाघेरे निवडून आले पाहिजेत. भाजपने नेहमीच महाराष्ट्राचा अपमान केला. बारणे यांचे नेत्यांना त्यांच्याबाबत बोलण्यासाठी काही नाही म्हणून काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत. दबावतंत्र, धमकी दिली जाईल. त्याला भीक घालायची नाही. २०१४ पासून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती  बिघडविली आहे.

तर,  पनवेल, उरण, कर्जतमधून मोठे मताधिक्य देण्याची ग्वाही बाळाराम पाटील यांनी दिली.

जनशक्ती विरुद्ध धनशक्ती लढाई

संजोग वाघेरे म्हणाले, मतदारांनी निवडणूक हातात घेतली आहे. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ही लढाई आहे. गद्दारी गाडली जाईल. गद्दाराना त्यांची जागा दाखविली जाईल. दहा वर्षात मतदारसंघात एकही काम झाले नाही.

जोरदार शक्तिप्रदर्शन पिंपरीगाव येथून सकाळी साडे नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून उमदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीला सुरुवात झाली. संजोग वाघेरे परिवर्तन रथात विराजमान झाले होते. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, शगून चौक, काळेवाडी, चिंचवडगाव महासाधू मोरया गोसावी मंदिर, क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारक, चिंचवड स्टेशन मार्गे आकुर्डी येथील खंडोबा मंदिर येथे रॅली पोहोचली. खंडोबा माळ येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पदयात्रा सुरू होऊन म्हाळसाकांत चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे पदयात्रेचा आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे समारोप झाला.

Story img Loader