आम्ही आकडे वाढविण्यासाठी करार केलेले नाहीत. मागे काय झाले, कोणाबरोबर करार केले, यात मी जात नाही. राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे करार झालेले आहेत. याबाबत येणाऱ्या काळात तुम्हाला खात्री पटेल. काहींचे करार राहिले आहेत, ते ही राज्यात येणार आहेत. यानिमित्ताने राज्याची प्रगती योग्य होईल. त्यांना आरोप आणि टीका करण्यापलीकडे दुसरे काही काम आहे का? त्यांना टीका करू दे आम्ही कामातून उत्तर देऊ, अशी भूमिका एकनाथ शिदेंनी विरोधकांना सुनावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – डाव्होसमध्ये नेमकं काय घडलं? उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त २८ तास…

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मांजरी बुद्रुक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. डाव्होसवरून विरोधक आक्रमक झाले आहेत या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी सदर भूमिका मांडली.

हेही वाचा – डाव्होस परिषदेतील गुंतवणुकीवरून वाद : राज्यातील कंपन्यांशीच करार केल्याचा विरोधकांचा आरोप

आजच्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या कार्याचे कौतुक केले या प्रश्नावर ते म्हणाले की, शरद पवार साहेब हे देशाचे आणि राज्याचे अनुभवी नेते आहेत. सहकार क्षेत्रात त्यांनी अनेक बदल घडवले, त्यांच्यामुळे एक वेगळी उंची लाभली, जे सत्य आहे ते मी बोललो असे एकनाथ शिंदे म्हणाले.