पुणे : ‘पुरंदर येथील नियोजित विमानतळ उभारताना कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही, कोणावर जबरदस्ती न करता हा विमानतळ उभारला जाईल,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पुरंदर विमानतळासाठी अडीच हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून, या विमानतळामुळे शेतकऱ्यांचा फायदा होऊन रोजगारनिर्मिती होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुरंदर – हवेली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा झाली. त्यामध्ये ते बोलत होते. या वेळी माजी आमदार अशोक टेकवडे, ममता शिवतारे, माजी आमदार भगवान साळुंखे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, बाबा जाधवराव, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, संदीप हरपळे, पंकज धिवार, नीलेश जगताप आदी उपस्थित होते.

Sudhir Mehta expressed his opinion regarding Pune Airport Pune news
‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
PM Modi
PM Narendra Modi : “विस्तारवाद नाही, विकासवादाच्या भावनेने काम सुरू”, मुंबईत युद्धनौका आणि पाणबुडीचे उद्घाटन केल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Malad Mith Chowki flyover , traffic,
मुंबई : मालाड मीठ चौकी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा
possibility of Eknath Shinde and Ganesh Naik coming together in municipal elections is less
महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच

हेही वाचा – ‘मावळ पॅटर्न’चे काय होणार?

पुरंदरचा गड शत्रूच्या हातात पडता कामा नये. आमदार, खासदार नसतानाही विजय शिवतारे यांनी अनेक योजना पुरंदर विधानसभेतील जनतेसाठी आणल्या. सासवड पाणीपुरवठा योजनेसाठी १७८ कोटी, जेजुरी पाणीपुरवठ्यासाठी ७८ कोटींचा निधी आणला. या भागाचा अधिक वेगाने विकास करण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन शिंदे यांनी मतदारांना केले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की राज्य सरकारने ‘लाडकी बहीण योजना’ जाहीर केल्यानंतर काही सावत्र, कपटी भाऊ न्यायालयात गेले. त्यांना जनाची नाही तरी मनाची लाज वाटायला हवी होती. आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो. सरकार पाडायला हिंमत लागते. सत्तेतून बाहेर पडलो. मात्र, विचारधारा सोडली नाही. गरिबांची जाण असलेले महायुतीचे सरकार आहे.

हेही वाचा – १६३ अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ देऊन रडीचा डाव, खासदार सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका

‘पुरंदरचा विमानतळ, गुंजवणीचे पाणी, एमआयडीसीचे विस्तारीकरण, नियोजित आयटी पार्क, हे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करा. यासाठी मतदारांनी महायुतीच्या पाठीशी उभे राहावे,’ असे आवाहन विजय शिवतारे यांनी केले.

Story img Loader