दत्ता जाधव,लोकसत्ता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : प्रशांत महासागरातील एल-निनोच्या स्थितीची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे यंदाचा हिवाळा आणि उन्हाळाही सरासरीपेक्षा जास्त उष्ण राहण्याचा अंदाज आहे. एल-निनोचे सुपर एल-निनोत रुपांतर झाल्यास पुढील मोसमी पावसाच्या हंगामावरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेतील नॅशनल ओशोनिक ॲण्ड ॲटमोस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनने (नोआ) दिलेल्या माहितीनुसार, एल-निनोची स्थिती मे महिन्यापर्यंत तीव्र होण्याची ८० टक्के शक्यता आहे. एल-निनोची स्थिती पुढील वर्षीही कायम राहून प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान सरासरीपेक्षा १.५ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यात आणखी भर पडून समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान २ अंश सेल्सिअसने वाढून तीव्र एल-निनोची स्थिती निर्माण होण्याची ३० टक्के शक्यता आहे. तीव्र एल-निनो म्हणजे सुपर एल-निनोची स्थिती निर्माण झाल्यास उत्तर गोलार्धावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विम्याचे कवच
भारतावर काय परिणाम?
एल-निनोची तीव्रता वाढल्यास किंवा पुढील वर्षीही एल-निनो सक्रिय राहिल्यास भारतात नैऋत्य मोसमी पावसावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. वाऱ्याचा प्रवाह कमजोर राहून, कोरडे, कमी बाष्पयुक्त वारे भारतात दाखल झाल्यास सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची भीती आहे. यंदा एल-निनोमुळेच ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्याचे आणि जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर सरासरीपेक्षा उष्ण राहण्यामागे एल-निनो हे प्रमुख कारण असल्याचेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
उन्हाळ्याबाबत आता भाष्य शक्य नाही
भारतीय हवामान विभागाने आजवरच्या निरीक्षणानुसार डिसेंबरपर्यंत एल-निनोची स्थिती कायम राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्याचा परिणाम म्हणून हिवाळा सरासरीपेक्षा उष्ण राहू शकतो. उन्हाळ्यातील स्थितीबाबत किंवा पुढील वर्षाच्या मोसमी पावसावरील परिणामांबाबत सध्या काहीही सांगता येणार नाही, असे मत हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केले.