एसटी बसच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना स्वारगेट परिसरात घडली. रोहिणी पांडुरंग भोसले (वय ६२, रा. मल्हार पेठ, सातारा) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत भोसले यांची मुलगी माधुरी नितीन देशपांडे (वय ३९, रा. सातारा) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा : पुणे : आजीच्या प्रसंगावधानामुळे शाळकरी मुलीच्या अपहरणाचा डाव उधळला

रोहिणी भोसले स्वारगेट स्थानक परिसरातून जात होत्या. त्या वेळी भिवंडी ते सांगोला या मार्गावरील एसटी बसने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रोहिणी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी एसटी बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.

Story img Loader