बारामती : बारामती येथील एक ज्येष्ठ वृद्ध सकाळी प्रभात फेरीसाठी गेले असताना बसचा धक्का लागल्यामुळे झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला, मोतीलाल उत्तमचंद दोशी ( वय ८२, राहणार सुभाष चौक, बारामती.) असे या अपघाता मध्ये मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, या प्रकारणी सतीश कांतीलाल जोशी ( वय ७१, राहणार कचेरी रोड,बारामती,) यांनी शहर पोलीस ठाण्यात मध्ये या अपघाता बाबत तक्रार दाखल केली आहे,
बारामती शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे साधारण साडेसहाच्या दरम्यान पायी प्रभातफेरी करिता फिरायला जात असताना मागून येणारी टाटा कंपनीची बस नंबर एम. एच. ०.१. एल. ७३०९ या बस गाडीचा चालक सुनील पांडुरंग शेंडगे ( वय ३९, राहणार खंडोबानगर,बारामती ) यांनी जोरदार पणे धडक दिल्यामुळे एका ज्येष्ठ वृद्धाचा मृत्यू झाला आहे, बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बस चालकाने भरधाव वेगामध्ये वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून बेकायदा पद्धतीने बस चालवल्याने वृद्धाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मोठी दुखापत होऊन त्यांचा मध्ये मृत्यू झाला.
हा अपघात झाल्यानंतर या अपघाताची माहिती पोलिसांना न देता तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्या वृद्धाला उपचाराकरिता दवाखान्यांमध्ये न दाखल करता बस भिगवन रोडच्या बाजूने जोरात निधुन गेल्या प्रकरणी बस चालक सुनील शेंडगे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे,बारामती नगरपालिका समोरील रस्त्या दुरुस्तीचे काम गेले अनेक दिवसांपासून अतिशय संथ गतीने सध्या चालू असून या चौकाच्या आजूबाजूला अपघाताचे प्रमाणात मोठी भर पडत चालली आहे.
बारामती नगरपालिका जवळील तीन हत्ती चौक हा तर आज भुलभुलय्या चौक म्हणून नवीन ओळख निर्माण करून देत आहे, या ठिकाणी वाहतूक कोंडी सातत्याने होत असून वाहतुकीच्या नियमाचे पालन न केल्याने लहान मोठे अपघात मोठ्या प्रमाणात वाढीस लागत आहे, तसेच याच चौकामध्ये नित्य नियमाने संध्याकाळी आणि सकाळी चार चाकी वाहनावर काही जण आपली दुकाने थाटून विक्री करणारे दुकानदारांमुळे सुद्धा वाहतुकीची कोंडी होती आहे, या सर्व कारणामुळे या परिसरातील अपघाताचे प्रमाण हल्ली दिवसेंदिवस वाढीत चाललेली दिसून येत आहे.
या अपघात प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विशाल नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार खेडकर आणि टापरे हे पुढील तपास करीत आहे.