पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा दुचाकीच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना ओैंध परिसरात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भीमराव कांबळे (वय ६९, रा. राजेंद्रप्रसाद शाळेजवळ, बोपोडी) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत कांबळे यांचा मुलगा हर्षवर्धन यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा : पुणे : लोहगावमध्ये डंपरच्या धडकेत सायकलस्वार शाळकरी मुलीचा मृत्यू
भीमराव कांबळे ओैंधमधील स्पायसर कॅालेज परिसरातून जात होते. त्या वेळी भरधाव दुचाकीने कांबळे यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झमालेल्या कांबळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सुळ तपास करत आहेत.
First published on: 06-09-2022 at 16:22 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elderly pedestrian dies after being hit by two wheeler in aundh pune print news tmb 01