पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात करोनासह साथीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून ७५ वर्षांच्या वृद्धेचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. संबंधित वृद्ध महिलेला एका खासगी रुग्णालयात गुडघ्यांचे प्रत्यारोपण करण्यासाठी नऊ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. गुडघ्यांचे प्रत्यारोपण करण्यात आले. रुग्णालयात दाखल असतानाच १२ एप्रिल रोजी या महिलेला श्वसनाचा त्रास होऊ लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१३ एप्रिल रोजी करोना चाचणी सकारात्मक आली होती. या वृद्ध महिलेला मधुमेह, उच्च रक्तदाब व संधिवात हे आजार होते, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचे १६४ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी १६२ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. महापालिका रुग्णालयात दोन सक्रिय रुग्ण दाखल आहेत. शहरात एक जानेवारी २०२३ पासून आतापर्यंत दोघांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

नागरिकांनी सर्दी, खोकला, घसादुखी, ताप ही लक्षणे असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने करोनाची चाचणी करावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मुखपट्टीचा वापर करावा. 

-डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय विभागप्रमुख, पिंपरी-चिंचवड महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elderly person died due to corona virus in pimpri chinchwad pune print news ggy 03 ysh
Show comments