पुणे : क्रेडिट कार्डची माहिती घेण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेच्या खात्यातून चार लाख ८४ हजारांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्येष्ठ महिला एरंडवणे भागात राहायला आहेत. त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एका महिलेने संपर्क साधला. बँकेतून बोलत असल्याची बतावणी महिलेने केली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
ज्येष्ठ महिलेच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती महिलेने घेतली. या माहितीचा गैरवापर करुन त्यांच्या बँक खात्यातून चार लाख ८४ हजार ८०० रुपये लांबविण्यात आले. बँक खात्यातून रोकड लांबविण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पठाण तपास करत आहेत.
First published on: 18-09-2022 at 15:24 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elderly woman extorted five lakhs on the pretext of obtaining credit card information pune print news tmb 01