पुणे : भेटवस्तुच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेचे अडीच लाख रुपयांचे दागिने चोरट्याने लांबविल्याची घटना कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आंबेगाव बुद्रुक भागात राहायला आहेत. कुरिअर कंपनीतून आल्याची बतावणी करुन चोरटा त्यांच्याकडे आला. मुलाला भेटवस्तुचे खोके पाठविण्यात आल्याचे आमिष त्याने महिलेला दाखविले. भेटवस्तुचे खोके मिळाल्याच्या पावतीवर स्वाक्षरी करावी लागेल, असे सांगून चोरट्याने महिलेला घरातून बाहेर नेले. महिलेला बोलण्यात गुंतवणूक चोरट्यांनी त्यांच्याकडील आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लांबविले. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा