कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघातांचे सत्र कायम असून, रविवारी रात्री अवजड ट्रकच्या चाकाखाली सापडून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रभावती पांडुरंग अनभुले (वय ७०, रा. विघ्नहर्तानगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अनभुले रविवारी रात्री दहाच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन निघाल्या होत्या. त्यावेळी भरधाव ट्रकने (कंटेनर) पादचारी अनभुले यांना धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : भिन्न रक्तगट असूनही यकृत प्रत्यारोपण यशस्वी

गेल्या काही दिवसांपासून कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरू आहे. ५ ऑगस्ट रोजी भरधाव ट्रकने ११ वाहनांना धडक दिली. अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला होता. ट्रकने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनाला धडक दिली. सुदैवाने शाळकरी मुलांना दुखापत झाली नाही. दरम्यान, अपघाताच्या घटनांमुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता तसेच पाच जण गंभीर जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर गोकुळनगर चौकात अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवशंभू प्रतिष्ठानसह परिसरातील विविध सामाजिक संस्थांकडून श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजस सोसायटी, सिल्वर ओक, श्रीनिवास संकुल, हॅमी पार्क, सुखदा वरदा संकुल, गंगा ओसियन, इरॉस इंटरनॅशनल, उत्कर्ष सोसायटी, यशश्री सोसायटी, आयडियल पार्क आदी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांसह विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, रहिवासी सहभागी झाले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elderly woman killed in road accident on katraj kondhwa road pune print news rbk 25 zws