ससून रुग्णालयात ज्येष्ठ महिलेचे एक लाख २० हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत एकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- “आत्ता निवडणूक आयोगाने कुठलाही निर्णय देऊ नये, कारण १६ आमदार…”, कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांचं महत्त्वाचं विधान

तक्रारदार मूळचे दौंड तालुक्यातील कुरकुंभचे रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांना ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वडिलांची देखभाल करण्यासाठी त्यांची आई रुग्णालयात आली आहे. रात्री तक्रारादाराच्या आईने दागिने काढून पिशवीत ठेवले. चोरट्याने पिशवीतील कर्णफुले आणि गंठण असा एक लाख २० हजारांचा ऐवज लांबविल्याचे सकाळी उघडकीस आले. पोलीस नाईक शंकर संपते तपास करत आहेत.