लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषित केल्यानंतर आम आदमी पक्षाने आता प्रत्यक्ष निवडणूक तयारीला सुरुवात केली असून विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तेरा सदस्यांची लोकसभा समिती नियुक्त करण्यात आली आहे.
आम आदमी पक्षातर्फे पुण्यातून प्रा. सुभाष वारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकीच्या पुढील तयारीसाठी पक्षातर्फे प्रमुख जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या असून निवडणुकीच्या तयारीसाठी विविध विभाग तयार करण्यात आले आहेत. या विभागांची जबाबदारी कार्यकर्त्यांकडे देण्यात आली असून विभाग प्रमुखांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. संपूर्ण निवडणुकीसाठी पुणे मतदारसंघाचे मुख्य समन्वयक म्हणून दीपक टावरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर प्रवक्ते म्हणून तन्मय कानिटकर, रणजित गाडगीळ आणि आभा मुळे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
निवडणूक संकल्प पत्र तयार करण्याचे कामही रणजित गाडगीळ यांना देण्यात आले असून कार्यकर्ता आणि मनुष्यबळ विकास ही जबाबदारी इंद्रनील सदलगे यांच्यावर, तर सोशल मीडिया आणि आयटी तंत्रज्ञान वगैरे जबाबदारी गोपाळ शर्मा यांच्यावर देण्यात आली आहे. अन्य विभागांचे प्रमुख म्हणून श्रीकांत आचार्य (आर्थिक व्यवहार), अ‍ॅड. दीप्ती काळे (विधी सल्लागार), दीपक टावरी, राजेश मित्तल (प्रचार नियोजन), इब्राहीम खान (सभा-यात्रा संयोजन), अमित खंडेलवाल (अनिवासी भारतीयांशी समन्वय) यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील टप्प्यात पक्षाचा महिनाभराचा कार्यक्रम जाहीर होणार असून सोशल मीडियाचाही उपयोग करून घेतला जाणार असल्याचे तन्मय कानिटकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election aap committee
Show comments