लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहित लागू होण्यापूर्वी सनदी अधिकारी आणि राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. मात्र, अनेक बदल्या करताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे नियम, निकष पायदळी तुडविण्यात आल्याच्या तक्रारी होत आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच अनेक अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दणका देत १०९ अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या आहेत.

बदल्या करताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे नियम, निकष यांचे पालन करण्यात आले नसल्याच्या तक्रारी आयोगाकडे दाखल झाल्या होत्या. तसेच अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाकडे (मॅट) धाव घेतली होती.

आणखी वाचा-पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने केला ‘हा’ खुलासा

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या करताना नियम, निकषांचे पालन न केल्याने अनेक अधिकारी मॅटमध्ये गेले होते. याबाबत मॅटने केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणुकीच्या अनुषंगाने बदली करतानाचे नियम, निकष तपासून पाहण्याची विनंती केली होती. अशी २२५ प्रकरणे आयोगाकडे दाखल झाली होती. या प्रकरणांची छाननी केल्यानंतर १०९ बदल्या नियम, निकषानुसार झाल्या नसल्याचे निदर्शनास आले. ही बाब मॅट आणि राज्य शासनाला कळविण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणांत नियमाप्रमाणे कार्यवाही करावी लागणार आहे.’

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election commission slapped the state government cancellation of transfers of 109 officials pune print news psg 17 mrj
Show comments