मतदानाच्या दिवशी मतदार घराबाहेर पडावा, यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाची पळापळ सुरू असते. मतदाराने मतदान केंद्रात येऊन मतदान केले, तरी मतदान कोणाला केले असेल, याचा अंदाज लागणे कठीण. त्यामध्येच काही बोगस मतदार येऊन मतदान करून जाण्याचे प्रकार आजही घडत असतात. पुण्यात नगरपालिका असताना मात्र चित्र वेगळे होते. मतदाराने मतदानासाठी येण्यापासून मतदान करेपर्यंत अनेक गमतीजमती घडायच्या. मतदाराने मतदान कोणाला केले, हे तर उघड-उघड समजायचे; पण बोगस मतदान होण्याला थारा नसायचा. कारण त्यावर तत्कालीन नगरपालिकेच्या प्रशासनाची भिस्त ही वसुली कारकुनावर होती. त्यामुळे बोगस मतदान हा प्रकारच होत नव्हता.

आज मतदानाच्या प्रक्रियेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असला, तरीही बोगस मतदान होण्याचे प्रकार घडतच असतात. मतदाराने मतदानाला यावे, यासाठी पूर्वी आणि आताही राजकीय पक्षांची धावपळ मतदानाच्या दिवशी सुरू असते. आता आचारसंहितेच्या कडक नियमांमुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदारांना मतदान केंद्रामध्ये आणण्यासाठी उघडपणे काही करता येत नाही. मात्र, गुप्तपणे हे प्रकार सुरूच असतात. मतदारांना मतदान केंद्रावर आणल्यावर त्याने मतदान कोणाला केले, याचा अंदाज बांधणे अवघड असते. मात्र, हमखास मत देणाऱ्या मतदारांची उमेदवार आणि त्याच्या विश्वासू साथीदारांना माहिती असते. त्यावरून प्रत्येक मतदान केंद्रावर किती मतदान झाले आणि आपापल्या हक्काच्या परिसरातील किती मतदारांनी मतदान केले, यावरून उमेदवार निकालाचा कल जाणतात. मात्र, प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी प्रत्येक मतदानाचे आकडे समोर येईपर्यंत कोणत्याही उमेदवाराच्या मनात धास्ती असते. त्यात बोगस मतदान झाले असेल, तर सर्वच गणिते बिघडतात.

women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Eat Right Station certification is awarded by FSSAI
रेल्वे स्थानकावर आता बिनधास्त खा! पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह १० स्थानके ‘ईट राइट स्टेशन’
Cases of violation of Model Code of Conduct in Pune during poll campaign
आचारसंहिता भंगाचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल; सिंहगड रस्ता पोलिसांकडून कारवाई
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा >>> रेल्वे स्थानकावर आता बिनधास्त खा! पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह १० स्थानके ‘ईट राइट स्टेशन’

सध्या बोगस मतदान रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या यंत्रणा असतानाही बोगस मतदानाचे प्रकार घडतच असतात. नामसाधर्म्य पाहून एखाद्या मतदाराच्या नावावर दुसऱ्याने मतदान करणे, मतदारसंघातील रहिवासी नसताना मतदारयादीत नाव समाविष्ट करून मतदान करणे असे प्रकार आजही घडताना दिसतात. त्यावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि गदारोळ होतो. निकाल जाहीर झाल्यावर सर्व काही थंडावते.

हेही वाचा >>> सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल

पुणे ही नगरपालिका असतानाही मतदानाच्या दिवशी अनेक गमतीजमती घडायच्या. त्या वेळी वॉर्डांची संख्या आणि मतदारांची संख्याही कमी असायची. प्रत्येक वॉर्डात एकच मतदान केंद्र तयार केले जायचे. त्यामध्ये प्रत्येक उमेदवाराच्या मतपेट्या ठेवल्या जात असत. काही उमेदवार अशिक्षित असायचे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रंगांचे वाटप करून मतपेट्यांना संबंधित रंगाचे कागद चिकटवून त्यावर उमेदवाराचे नाव लिहिण्यात येत असे. आचारसंहिता नसल्याने आणि उमेदवाराच्या खर्चावर मर्यादा नसल्याने त्या वेळी मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी टांगे वापरले जायचे. टांग्यावर पुढे आणि मागे उमेदवाराच्या नावाचा फलक लावण्यात येत असे. उमेदवाराचे कार्यकर्ते म्हणजे त्या भागातील वजनदार मंडळी असायची. मतदाराला मतपत्रिका दिल्यावर त्याची स्वाक्षरी आणि निरक्षर असल्यास अंगठा घेऊन कार्यकर्तेच मतपत्रिका उमेदवाराच्या मतपेटीमध्ये टाकत. त्यामुळे उमेदवाराला किती मतदान झाले आणि आणखी किती मतांची गरज आहे, याचा अंदाज उमेदवारांना येत असे. त्या दृष्टीने त्यांची मतदानाच्या दिवशी पळापळ सुरू असायची.

मात्र, बोगस मतदानाला वाव नसायचा. बोगस मतदानावर तत्कालीन नगरपालिकेने नामी युक्ती शोधून काढली होती. वसुली कारकुनावर सर्व भिस्त असायची. वसुली कारकून हे करवसुलीसाठी प्रत्येक घरी जायचे. त्यामुळे त्यांना प्रत्येक पेठेतील घरमालक ओळखीचे असत. वसुली कारकुनाकडून ओळख पटल्याशिवाय मतदाराला मतपत्रिका दिली जात नसे. त्यामुळे बोगस मतदान टाळले जायचे.

आता अत्याधुनिक युगात अनेक सुविधा झाल्या असताना अद्यापही पुण्यासारख्या शहरात मतदानाचे प्रमाण कमी असते. जेमतेम ५० टक्के मतदार मतदान करतात. उर्वरित मतदार उमेदवार किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हाती लागत नाहीत. उपलब्ध असलेल्या मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्याचे आव्हान उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपुढे असणार आहे. बोगस मतदानाची ओरड प्रत्येक निवडणुकीत सुरूच असते. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी हे सर्व चित्र पाहायला मिळणार आहे.

sujit.tambade@expressindia.com

Story img Loader