मावळ लोकसभेच्या जागेसाठी शिवसेनेत ‘पेच’ असताना राष्ट्रवादीने मावळचे नाव गुलदस्त्यात ठेवल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे, ‘आप’तर्फे मावळसाठी पिंपरी पालिकेचे माजी नगरसेवक मारुती भापकर यांची उमेदवारी जाहीर झाल्याने आता मावळची लढत बहुरंगी व रंगतदार होणार आहे.
राष्ट्रवादीने गुरुवारी १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्यात मावळचा समावेश नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार ‘कारभारी’ असलेल्या पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या मावळसाठी
शिवसेनेत खासदार गजानन बाबर व नगरसेवक श्रीरंग बारणे यांच्यात काटय़ाची स्पर्धा आहे. नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची, असा पक्षासमोर पेच आहे. उद्धव ठाकरे यांनी बाबर व बारणे तसेच स्थानिक नेत्यांशी अनेकदा वैयक्तिक चर्चा केली. योग्य वेळी उमेदवार जाहीर करू. देईल त्या उमेदवारास निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी यापूर्वीच केले आहे. अशातच, विविध संस्था, संघटनांशी संबंधित असलेले चळवळीतील कार्यकर्ते भापकर मावळच्या रिंगणात आल्याने निवडणुकीची रंगत वाढणार आहे. तूर्त, शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ हाच सर्वत्र चर्चेचा विषय आहे.
मावळसाठी शिवसेनेत ‘पेच’ अन् राष्ट्रवादीचा उमेदवार गुलदस्त्यात
मावळ लोकसभेच्या जागेसाठी शिवसेनेत ‘पेच’ असताना राष्ट्रवादीने मावळचे नाव गुलदस्त्यात ठेवल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-02-2014 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election maval ncp shiv sena aap