अनधिकृत बांधकाम प्रकरणी प्रामाणिक प्रयत्न होत नसून सर्वच राजकीय पक्षांनी जनतेची फसवणूक केली आहे, असा आरोप ‘आप’चे मावळ लोकसभेचे उमेदवार मारुती भापकर यांनी केला आहे. ‘मनी’ व ‘मसल पॉवर’च्या राजकारणात सामान्य कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
भापकर म्हणाले, सहाही विधानसभा मतदारसंघांत ओळख तसेच काम असल्याने मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, तरीही आपला मत दिल्यास वाया जाईल, असा अपप्रचार सुरू आहे. कोणी आपल्याला उभे केले नाही, कोणाची मते खाण्यासाठी आपण रिंगणात नाही, लढतो आहे तेजिंकण्यासाठी, आमची लढत महायुतीशी आहे. पिंपरी पालिकेतील चुकीच्या गोष्टींना आपण सातत्याने विरोध केला, उधळपट्टीला, भ्रष्टाचाराला शक्य तितका चाप लावला. कामगार व शेतक ऱ्यांच्या आंदोलनात तसेच जनतेशी संबंधित अनेक चळवळीत सहभाग घेतला. जनतेला आपले काम माहिती आहे आणि सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांनाही जनता ओळखून आहे. अनधिकृत बांधकामप्रकरणी आपण लढा दिला, त्यात सिंहाचा वाटा आपला असताना युतीचे नेते श्रेयासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी जनतेची फसवणूक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा