महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे ६१वे अधिवेशन ६ आणि ७ नोव्हेंबरला अहमदनगर येथे होणार आहे. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी महेंद्र गणपुले यांची निवड करण्यात आली. महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष माने, अरुण थोरात यांनी ही निवड जाहीर केली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष जे. के. पाटील, सचिव शांताराम पोखरकर, शिवाजी किलकिले, रंगसिद्ध दसाडे आदी उपस्थित होते. महेंद्र गणपुले हे जुन्नर तालुक्यातील गुरुवर्य एकनाथ गोविंद देव विद्यालय येथे मुख्याध्यापकपदी कार्यरत आहेत. गेली ३५ वर्षे ते शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election of mahendra ganpule as the president of the convention pune print news amy