पुणे : मतदान केंद्रात भ्रमणध्वनी नेण्यावरून झालेले वाद आणि मतदान यंत्र काही काळ बंद पडण्याचा अपवाद वगळता पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया बुधवारी शांततेत पार पडली. मतदान केंद्रांबाहेर सकाळी लागलेल्या रांगा, दुपारी १ ते ४ मंदावलेला वेग, मतदान केंद्रांबाहेर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची लगबग, सुसज्ज प्रशासकीय व्यवस्था आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त असे आश्वासक चित्र मतदान प्रक्रियेवेळी दिसून आले. ज्येष्ठ नागरिकांबरोबरच ‘लाडक्या बहिणीं’चा मतदान प्रक्रियेतील लक्षणीय सहभाग ही मतदानाची वैशिष्ट्ये ठरली.

शहरातील कसबा, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, खडकवासला, हडपसर, वडगावशेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट या आठही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाल्यानंतर मतदान केंद्रातील बिघाडामुळे काही केंद्रांवरील मतदानाला १५ मिनिटे उशिरा प्रारंभ झाला. मतदान केंद्रातील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.

academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
maharashtra vidhan sabha mpsc
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा; पारंपरिक आणि तथ्यात्मक प्रश्न
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
Ladki Bahin Yojana application scrutiny Aditi Tatkare
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार की नाही? आदिती तटकरे महत्त्वाची माहिती देत म्हणाल्या…
kumar ashirwad on Markadwad
“…तर भारतात बांगलादेशसारखी स्थिती झाली असती”, मारकडवाडीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य
Vanchit Bahujan Aaghadi Maharashtra Assembly Election Results 2024
वंचितही ईव्हीएमविरोधात आक्रमक, थेट निवडणूक आयोगाला पत्र; विचारले ‘हे’ तीन प्रश्न
markadwadi villagers marathi news
मारकडवाडी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक, रामदास आठवले यांची भूमिका

हेही वाचा…पिंपरीतील शेवटच्या टप्प्यातील मतदार कोणाला धक्का देणार?

कसबा, कोथरूडसह पर्वती आणि खडकवासला मतदारसंघात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्या तुलनेत शिवाजीनगर, हडपसर, वडगावशेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील मतदानाचा वेग काहीसा संथ होता. दुपारी एक ते चार या कालावधीत कसबा, खडकवासला मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघांत तुलनेने कमीच मतदान झाले. संध्याकाळी चार वाजल्यानंतर मतदार बाहेर पडल्याने मतदानाचा वेगही वाढला. त्यामुळे अनेक मतदार केंद्रांबाहेर सहानंतरही मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.
लोकसभा निवडणुकीत दुबार मतदार, नावे वगळली गेल्याच्या तक्रारी, मतदान केंद्र बदलण्यात आल्याचा अनुभव अनेक मतदारांनी घेतला होता. विधानसभा निवडणुकीत मात्र त्याची पुनरावृत्ती झाली नाही. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी, तर प्रशासकीय पातळीवर कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी जिल्हा निवडणूक शाखेच्या अधिकाऱ्यांकडून दक्षता घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार याद्यातील घोळही फारसा दिसून आला नाही. त्यामुळे केंद्राबाहेर गोंधळ झाला नाही. बोगस मतदानाच्या तक्रारीही झाल्या नाहीत.

ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था, व्हीलचेअर, पाळणाघर अशा सुविधा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्याचा मतदारांनीही लाभ घेतला. मतदान केंद्रांची वाढलेली संख्या, आणि केंद्रांच्या रचनेतील बदलामुळेही मतदानाची प्रक्रिया वेगाने आणि शांततेमध्ये पार पडली. मतदारांनाही मतदान केंद्रांवर जास्त काळ ताटकळत उभे राहावे लागले नाही. काही केंद्रांवर मात्र मतदान प्रक्रिया संथ असल्याचेही दिसून आले. मतदारांची गर्दी नसतानाही विलंब होत असल्याबाबत मतदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा…चिंचवडमध्ये वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर?

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांकडूनही मतटक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मतदारसंघांमध्ये मतदानाची चिठ्ठी मतदानापूर्वीच कार्यकर्त्यांकडून पोहोचविण्यात आली होती. त्यावर मतदान केंद्र, मतदार यादीतील क्रमांकाची माहिती असल्याने केंद्र शोधणे मतदारांसाठी सुलभ झाले. सकाळी आणि संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांकडून मतदानाला प्रतिसाद देण्यात आला, तर पुरुषांबरोबरच महिलांची मतदारांची संख्याही लक्षणीय असल्याचे दिसून आले.

मतदान ओळखपत्रावरून वाद

काही मतदारांकडे जुने मतदान कार्ड असल्याने त्यावरील छायाचित्रही जुने आहे. त्यामुळे मतदान करणारी व्यक्ती आणि ओळखपत्रातील छायाचित्रात फरक असल्याने काही मतदान केंद्रांवर वादाचे प्रसंग घडले. मात्र, अन्य पुरावे पाहून मतदारांना मतदान करण्यास परवानगी देण्यात आली. काही मतदान केंद्रांत पोलीस आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून मतदारांना भ्रमणध्वनी घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली, तर काही ठिकाणी ती नियमानुसार नाकारण्यात आली. परवानगी नाकारल्यानंतरही काही केंद्रांवर वाद झाले.
ठळक बाबी

चोख प्रशासकीय व्यवस्था

राजकीय कार्यकर्त्यांचा उत्साह

दुपारी मतदानाला थंड प्रतिसाद

महिलांची लक्षणीय संख्या

बोगस मतदानाच्या तक्रारींमध्ये घट

Story img Loader