पिंपरी पालिकेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या विद्युतदाहिन्या दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात येतात. त्यामुळे अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत येणाऱ्या नागरिकांची फरफट होत आहे. आगामी आर्थिक वर्षात संपूर्ण शहरात पर्यावरणपूरक शवदाहिन्या उभाराव्यात, अशी मागणी होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या वेगाने वाढते आहे. इतर सुविधा पुरवण्याबरोबरच स्मशानभूमीसाठी आवश्यक सुविधा देणे महापालिकेचे कर्तव्य आहे. सध्या शहरात भाटनगर, निगडी, सांगवी आणि भोसरीत विद्युत दाहिन्या आहेत. तर, मिलींदनगरला डिझेल दाहिनी आहे. किरकोळ दुरुस्तीचे कारण पुढे करून या दाहिन्या बंद ठेवण्यात येतात. त्यामुळे अंत्यविधीप्रसंगी मृतांच्या नातेवाईकांना अडचणींना सामोरे जावे लागते. दाहिन्या उपलब्ध असतानाही लाकूड आणि गोवऱ्या वापरून अंत्यविधी करावा लागतो, अशी तक्रार करण्यात आली आहे.

या अडचणींची सोडवणूक करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे यांनी प्रशासक व आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electrocute is off in pimpri chinchwad people facing problem pune print news hrc