लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : दुकानात निघालेल्या साडेअकरा वर्षाच्या मुलीचे अपहरण दुचाकीवर अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बलात्काराची घटना उत्तमनगर येथील एका लॉजवर घडली. याप्रकरणी अपहरण करणार्या दोघांसह लॉजच्या मालकासह व्यवस्थावक यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राहुल विनोदकुमार गौतम (वय २४, रा. अमरभारत सोसायटी, वारजे), अविनाश अशोक डोमपल्ले (वय २४, रा. वारजे),पिकॉक लॉजचा मालक भगवान दत्ता मोरे आणि लॉज व्यवस्थपक टिकाराम चपाघई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२१ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास साडेअकरा वर्षाची मुलगी दुकानात निघाली होती. आरोपी राहुल विनोदकुमार गौतम आणि त्याचा साथीदार मित्र अविनाश अशोक डोमपल्ले या दोघांनी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अपहरण केले. त्यानंतर ते तिला उत्तमनगर येथील पिकॉक लॉजवर घेऊन गेले. तेथे राहुल गौतम याने मुलीला तु माझ्याशी विवाह कर नाहीतर तुला मारून टाकेन अशी, धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. तर मुलगी दहा वर्षाची असतानाही असतनाही आरोपी राहुल याने तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तर अविनाश डोमपल्ले याने तू राहुलसोबत विवाह कर नाहीतर वाईट परिणाम होतील, अशी धमकी दिली. पिकॉक लॉजचा मालक भगवान दत्ता मोरे आणि लॉजचा व्यवस्थापक टिकाराम चपाघई याने मुलगी अल्पवयीन असताना तिच्याबाबत कोणतीही खात्री न करता तिला राहुल याच्यासोबत जाऊ जाण्यास हरकत घेतली नाही. त्यामुळे याप्रकरणात चौघांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस तपास करत आहेत.