राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा होता. या कार्यक्रमात शरद पवारांनी आपल्या साठ वर्षांच्या कारकिर्दीबाबत चर्चा केली. त्यानंतर शेवटी आपण पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे चांगलेच भावूक झालेले पाहण्यास मिळाले. शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मनधरणी केली. त्यानंतर दोन ते तीन दिवसात विचार करुन निर्णय कळवतो असा निरोप शरद पवारांनी अजित पवारांकरवी दिला आहे. अशात पुण्यात लागलेल्या बॅनर्सची चर्चा चांगलीच रंगली आहे.

काय आहे पुण्यातल्या बॅनर्सवर?

साहेब, निवृत्त पदाधिकारी होत असतात. जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जनतेच्या मनातील राजे नव्हे. आज महाराष्ट्रच तर अवघ्या देशाला आपल्या नेतृत्वाची गरज आहे. कृपया आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा. पवार साहेब म्हणजेच राष्ट्रवादी, राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार. असं बॅनर पुण्यात लागलं आहे. आता शरद पवार नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Dhananjay Munde Beed Guardian Minister
Dhananjay Munde: “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर…”, दिल्लीमध्ये भेटीगाठी घेतल्यानंतर धनंजय मुंडे काय म्हणाले?
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : पालकमंत्रिपदाचा वाद विकोपाला? “…तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो”, भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना खुलं आव्हान
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Sunil Tatkare On Uttamrao Jankar
Sunil Tatkare : “…तोच खरा राजीनामा असतो”, सुनील तटकरेंची आमदार उत्तम जानकरांच्या राजीनाम्याच्या विधानावरून खोचक टीका
Uttamrao Jankar Will Resign from MLA
Uttamrao Jankar : शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर आमदारकीचा राजीनामा देणार; निवडणूक आयोगाकडे केली ‘ही’ मोठी मागणी

काय घडलं मंगळवारी?

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं मंगळवारी जाहीर केल्यानंतर मंगळवारी दुपारी पावणेतीनपर्यंत शरद पवार यांना सगळेच जण आवाहन करत होते की तुम्ही हा तुमचा निर्णय मागे घ्या. मात्र शरद पवार यांनी निर्णय मागे घेतला नाही. प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांनी सगळ्यांना आश्वासन दिलं की आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो. शरद पवार यांच्या जेवणाची वेळ ठरलेली असते ती टळून गेली आहे त्यामुळे तुम्ही त्यांचा विचार करा आणि त्यांना इथून जाऊ द्या. या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर शरद पवार हे कार्यक्रम स्थळावरून सिल्वर ओक या ठिकाणी गेले. मात्र त्यानंतर कार्यकर्ते उपोषणाला बसले.

शरद पवार यांनी निर्णय मागे घेतल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही ही त्यांची भूमिका आहे. त्याच कार्यकर्त्यांशी शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या मोबाईलवरून संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी “हमारा नेता कैसा हो शरद पवार जैसा हो” आणि “सारे देश की बुलंद आवाज शरद पवार शरद पवार” अशा घोषणाही दिल्या.

Story img Loader