पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी काम केलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात येते. मात्र, या मानधनाच्या रकमेत तफावत असल्याचे समोर आले आहे. मतदान केंद्रे वेगळी असली, तरी कामाचे स्वरूप समान असताना मानधनाच्या रकमेत तफावत का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

निवडणुकीच्या कामात वेगवेगळ्या विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, केंद्रस्तरीय अधिकारी अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या या कर्मचाऱ्यांना दिल्या जातात. त्या कामासाठीचे प्रशिक्षणही दिले जाते. तसेच काम केल्यानंतर त्यासाठी स्वतंत्रपणे मानधनही दिले जाते. मात्र निवडणुकीत काम केलेल्या शिक्षकांना देण्यात आलेल्या मानधनात तफावत असल्याचे समोर आले आहे. निवडणुकीत पदानुसार काम वेगवेगळे असले, तरी वेगवेगळ्या केंद्रांवर कामाचे स्वरूप सारखेच असते. मग केंद्रानुसार मानधनाच्या रकमेत तफावत का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

st bus news in marathi
‘एसटी’चा प्रवास महागला, सुरक्षिततेचे काय? दोन वर्षांत ३०१ अपघात, ३५ जणांचा मृत्यू
pune pmp news in marathi
पुणे : ‘पीएमपी’ची पाच नवीन आगारे
pune airport news in marathi
उड्डाणे पुष्कळ; पण ‘उडान’ दूरच
pune crime news in marathi
पुणे : प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलांचे अपहरण, हडपसर पोलिसांकडून अपहृत वडिलांची १२ तासांत सुटका
pune vehicle vandalized news in marathi
Video : बिबवेवाडीत वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुंडाची धिंड
sant Tukaram maharaj suicide news in marathi
देहूत जगद्गुरू संत तुकोबांच्या वंशजाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
Police force outside actor Rahul Solapurkars house due to security purpose
सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त
devendra fadnavis pimpri chinchwad news in marathi
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस गुरुवारी पहिल्यांदाच बालेकिल्ल्यात
fake ordinance pune news in marathi
पुणे : बनावट अध्यादेश काढून वेतनवाढ मिळवण्याचा प्रयत्न उघड, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल

हेही वाचा >>> पिंपरी : ‘बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी मंत्रिपद, विधानपरिषद द्या

केंद्राध्यक्ष म्हणून कुठे १३०० रुपये, तर कुठे १४०० रुपये देण्यात आले. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे मानधन आहे. असाच प्रकार लोकसभा निवडणुकीवेळीही झाला होता, असे पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण रोडे यांनी सांगितले. तर खडकी येथील केंद्रावर काम केलेल्या शिक्षकांना १६०० रुपये, खराडीला काम केलेल्यांना १३०० रुपये, तर गणेश पेठेत काम केलेल्यांना ११५० रुपये देण्यात आले. त्यामुळे मानधनाची नेमकी रक्कम किती, दिलेल्या रकमेत तफावत का आहे, काम समान असताना मानधन समान का नाही, असे प्रश्न सुवर्णा देवळाणकर यांनी उपस्थित केले.

हेही वाचा >>> कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात पोलिसांची कारवाई योग्य; विशेष सरकारी वकिलांकडून आयोगासमोर अंतिम युक्तिवाद

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मानधन वाटपाचे अधिकार दिलेले आहेत. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मानधनानुसार अधिकारी, कर्मचाऱ्याना मानधन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अद्याप मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून खर्चाचा तपशील करण्याचे काम सुरू आहे. मानधनात तफावत असल्याबाबत प्रशासनाकडे तक्रार प्राप्त झालेली नाही, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी स्पष्ट केले.

बीएलओ मानधनाविना…

एकीकडे दिलेल्या मानधनात तफावत असताना केंद्रीय स्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून काम केलेल्या काही कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी केलेल्या कामाचे मानधन देण्यात आले. तर काहींना महिनाभर काम करूनही मानधन देण्यात आलेले नाही, असे एका शिक्षकाने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.

Story img Loader