पुणे : पुणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचे आरोग्य चांगले राहावे, तसेच त्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी ‘मेंटल हेल्थ ॲप’ खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सध्या या ॲपचे दोन हजार युनिट खरेदी केले जाणार असून, यासाठी कंपन्यांनी दिलेल्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) सव्वाकोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला जाणार असून, त्याला मान्यता मिळाल्यानंतर ही खरेदी केली जाणार आहे. पुणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये १७ ते १८ हजार कर्मचारी काम करतात. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मानसिक आणि शारीरिक तणावाला सामोरे जावे लागते. महापालिका कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबवित आहे. यामध्ये आरोग्य तपासणी, आरोग्यविषयक मार्गदर्शन, योग आदी उपक्रमांचा समावेश आहे. याचाच एक भाग म्हणून ‘मेंटल हेल्थ ॲप’ खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवली होती. यामध्ये तीन कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. त्यांची छाननी करून सर्वांत कमी दराची निविदा टचकिन ई-सर्व्हिसेस प्रा. लि. यांची आली आहे.

हेही वाचा – पुणे शहरात आता रात्रीही होणार कचरासंकलन, हे आहे कारण ?

महापालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करताना कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करताना कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना कर्मचाऱ्यांना त्रास होतो. याचा परिणाम आरोग्यावर होतो. हे टाळण्यासाठी महापालिकेने या हेल्थ ॲपची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – कोंढवा पोलीस ठाण्यात गोंधळ घालून महिला पोलिसांना धक्काबुक्की

या ॲपच्या दोन हजार युनिटची खरेदी केली जाणार आहे. एका युनिटसाठी ६ हजार ३७२ रुपये खर्च येणार आहे. मेंटल हेल्थ ॲपच्या दोन हजार युनिटसाठी १ कोटी २७ लाख ४४ हजार रुपये खर्च येणार आहे. हे युनिट दोन वर्षांसाठी घेण्यात येणार आहेत. हा खर्च सीएसआर निधीमधून करण्यात येणार आहे, याबाबतचा प्रस्ताव महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employee stress app solution pune municipal corporation proposal pune print news ccm 82 ssb