पुणे : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने शहरात आयोजित केलेल्या विविध रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यात ८५० बेरोजगार उमेदवारांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे.

करोनानंतर आता सर्व परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. करोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यापासून चार रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. या विभागामार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या रोजगार मेळाव्यांना बेरोजगार उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यानुसर गेल्या सहा महिन्यात या विभागामार्फत चार रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यात शहर आणि जिल्ह्यातील ६८ उद्योजक सहभागी झाले होते. या उद्योजकांनी विविध क्षेत्रातील ८९१९ रिक्तपदे कळविली होती. या चारही मेळाव्यात एकूण ५३७० उमेदवारांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ८५० उमेदवारांना चांगल्या वेतनाबरोबरच कायमस्वरूपी नोकरी मिळाली आहे, अशी माहिती या विभागाचे अधिकारी प्रशांत नलावडे यांनी दिली.

Story img Loader