ऑनलाइन टास्क पूर्ण करुन पैसे कमविण्याच्या आमिषाने अभियंता तरुणीची तब्बल २४ लाखांची फसवणूक झाली. हा प्रकार २ ते ५ मे दरम्यान पुनावळे येथे घडला.याप्रकरणी ३० वर्षीय तरुणीने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अभियंता आहे. आरोपींनी फिर्यादीला व्हॉटस्ॲपवर संपर्क साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पिंपरी : वल्लभनगर आगारात दोन बसमध्ये चिरडून महिला सहाय्यकाचा मृत्यू

काम देण्याचे आमिष दाखविले. टास्क पूर्ण करण्यास सांगितले. त्याकरिता विविध लिंक दिल्या. टास्क पूर्ण केल्यानंतर अधिकचे पैसे आणि बोनस देण्याचे आमिष दाखविले. काही टास्क सोडविल्यानंतर फिर्यादीला पैसै दिले. त्यामुळे फिर्यादीचा विश्वास बसला. त्यानंतर सहा टास्क सोडविण्यासाठी दिले आणि विविध खात्यात पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादीने २४ लाख ३८ हजार ७० रुपये भरले. आरोपींशी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळेना. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Engineer girl duped of rs 24 lakhs with the lure of earning money by completing online tasks pune print news ggy 03 zws