लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी नियमित तीन प्रवेश फेरीचे वेळापत्रक राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी १९ जुलै रोजी जाहीर होणार आहे. प्रवेशाची पहिली निवड यादी २५ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे.

rte registration process starting from Tuesday January 14
आरटीई प्रवेशांसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून, किती जागा उपलब्ध?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Maharashtra Board s Class 12admit card will be available online from Friday January 10
राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
MPAC Mantra Intelligence Test and Arithmetic Group B Non Gazetted Services Pre Exam sports news
एमपीएसी मंत्र: बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित; गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा
CET , Revised schedule, entrance exams, CET Cell,
सीईटी सेलकडून प्रवेश परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर, काय आहेत बदल?
CBSE Class 12th exam and two CET exams at same time
सीबीएसई बारावीची परीक्षा, दोन सीईटी परीक्षा एकाच वेळी… कोणत्या वेळापत्रकात बदल होणार?
JEE Mains Session 1 schedule announced Pune news
‘जेईई मुख्य’ सत्र एकचे वेळापत्रक जाहीर… कधी होणार परीक्षा?
cet dates will change due to schedule revised cbse class 12 exams
सीईटीच्या तारखांमध्ये बदल होणार; सीबीएसई पेपर असल्याने वेळापत्रकात सुधारणा

राज्य सीईटी सेलने अभियांत्रिकी प्रवेशासाठी नोंदणी आणि ऑनलाइन अर्ज मागविले होते. अर्ज करण्याची अंतिम मुदत आज सायंकाळी पाच वाजता संपली. अभियांत्रिकी प्रवेशासाठी १ लाख ७२ हजार १६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १ लाख ५५ हजार १०९ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्‍चिती केली आहे. यंदा अभियांत्रिकीसाठी सुमारे १ लाख ४० हजारच्या आसपास प्रवेशाची क्षमता आहे. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश फेरीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर राज्य सीईटी सेलने आज तीनही प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले.

आणखी वाचा-पुणे: अखेर औषधनिर्माणशास्त्र पदवी प्रवेशासाठी नोंदणी सुरू

दरम्यान, पहिल्या फेरीनंतर दुसरी प्रवेश फेरी २९ जुलैपासून सुरू होणार असून, तिसरी प्रवेश फेरी ७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे २५ ऑगस्टपर्यत अभियांत्रिकी प्रवेश पूर्ण करणे आवश्‍यक आहे, असे राज्य सीईटी सेलने स्पष्ट केले.

Story img Loader