करोना काळातील ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून १ सप्टेंबरपासून ज्ञानसुधार उपचारात्मक उपक्रम राबवला जाणार आहे. विद्यार्थ्यांची आधीच्या वर्षांतील अभ्यासक्रमाच्या संकल्पनांच्या आकलन स्तराची चाचणीद्वारे निश्चिती करून त्या आधारे ज्ञानसुधारासाठीची उपचारात्मक अध्ययन अध्यापन प्रक्रिया राबवली जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – पुणे : आधी शिल्लक जागा भरा ; क्रीडा क्षेत्रातून खेळाडू, संघटकांची एकत्रित मागणी

करोना काळात अध्ययन अध्यापन प्रक्रिया ऑनलाइन झाली. अध्यापकांचा विद्यार्थ्यांशी संवाद न झाल्याने विद्यार्थ्यांना संकल्पना स्पष्टता पुरेशी न झाल्याने, अपेक्षित अध्ययन निश्चिती झाली नाही. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर झाला. आता शैक्षणिक कामकाज पूर्वपदावर येत असताना आणि नवीन शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू होत असताना विद्यार्थ्यांना आधीच्या वर्गातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. अन्यथा नव्या संकल्पनांचे आकलन होणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांची आधीच्या वर्गातील संकल्पनांची उजळणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी उपचारात्मक अभ्यासक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांनी दिली.सर्व विद्याशाखांतील सर्व विषयांसाठी ज्ञानसुधार उपचारात्मक उपक्रम राबवला जाईल.१ सप्टेंबरपासून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही डॉ. सोनावणे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – पुणे : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी गर्दी ; मध्यभागात वाहतूक कोंडी

उपचारात्मक उपक्रमाचे स्वरूप
उपचारात्मक उपक्रमअंतर्गत चाचणी घेऊन विद्यार्थ्यांच्या आकलन स्तराची निश्चिती करण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना संकल्पना समजावून देण्यासाठी दहा ते वीस तासांचा उपचारात्मक कार्यक्रम राबवला जाईल. अभ्यासक्रम संपल्यावर उत्तर चाचणी घेऊन आकलन स्तर उंचावल्याची खात्री करून घेतली जाईल. त्यातही काही विद्यार्थ्यांचे आकलन पुरेसे झाले नसल्यास त्यांच्यासाठी पुन्हा विशेष बाब म्हणून अभ्यासक्रम राबवण्यात येईल.