मॉडर्न महाविद्यालय आणि गेनबा सोपानराव मोझे महाविद्यालयावर मागासवर्गीय विद्यार्थी आणि मागासवर्गीय शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांच्या विविध प्रश्नांबाबत चौकशी करण्यासाठी पुणे विद्यापीठाने समिती गठित केली आहे.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय, निगडी आणि मोशी येथील मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी आणि गेनबा सोपानराव मोझे ट्रस्टचे येरवडय़ातील गेनबा मोझे महाविद्यालय यांची चौकशी करण्यासाठी पुणे विद्यापीठाने समिती गठित केली आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी हे या महाविद्यालयांची चौकशी करणार आहेत. त्याचप्रमाणे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या गणेशखिंड येथील मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची चौकशी करण्यासाठी डॉ. अशोक घाटोळ, डॉ. प्रदीप लोखंडे, डॉ. नीलम पाटील यांची तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. या महाविद्यालयांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत तक्रार करण्यात आली होती.

Story img Loader