राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती शहरामध्ये मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. दोघांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गांधीजींच्या प्रतिमेस शहराध्यक्ष खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या हस्ते तर लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस अॅड. भगवान साळुंके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे जयंती साजरी करण्यात आली. कमिटीचे प्रवक्ते उल्हासदादा पवार आणि सचिन सावंत यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथील गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गांधी जयंती साजरी करण्यात आली. या वेळी कमिटीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रभाग क्रमांक ६६च्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका मनीषा चोरबेले यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण के ला.
जय भवानी टेक्निकल इन्स्टिटय़ूटतर्फे संस्थेचे उपाध्यक्ष विजय मखामले यांच्या हस्ते दोघांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला. कोथरुड ब्लॉक काँग्रेस (आय) कमिटीच्या वतीने अध्यक्ष उमेश कंधारे यांनी पुष्पहार अर्पण केला. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) संघटनेतर्फे पुणे शहर इंटकचे कायदेशीर सल्लागार अॅड. फैय्याज शेख यांनी पुष्पहार अर्पण केला. पुणे शहर व जिल्हा नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया संघटनेच्या वतीने कोथरुड येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातील महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. हा दिवस अंहिसा दिन म्हणून पाळला जावा, असे आवाहन शहराध्यक्ष अॅड. राहुल म्हस्के यांनी केले. कॅन्टोन्मेन्ट काँग्रेस कमिटीचे सचिव अयाज पठाण यांनी पुणे स्टेशन येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा