पुणे: लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य मिरवणुकी बरोबरच टिळक रस्त्यावरील मिरवणुकीतही उत्साह होता. गणेश मंडळांच्या सजावटी भक्तांचे लक्ष वेधून घेत होत्या. मात्र या रस्त्यावर तुलनेने गर्दी कमी दिसत होती. मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला मात्र तेवढेच उधाण आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : विसर्जन मार्गावर ध्वनिवर्धक, ढोल ताशांचा दणदणाट; आवाजाची तीव्रता मर्यादेबाहेर

मार्केट यार्ड मंडळाची सजावट लक्षवेधक होती. ग्राहक पेठेचा गणपती टिळक रस्त्यावर आल्यानंतर पाठोपाठ राणाप्रताप मंडळाचा गणपतीही मिरवणुकीत सामील झाला. या गणेश मंडळाला पोलिसांनी पुढे आणले. तरीही हा रस्ता तुलनेने मोकळाच होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enthusiasm ganesha devotees procession tilak street activists pune print news ysh