महापालिकेच्या इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रातर्फे ९ ते १३ डिसेंबर दरम्यान इंद्रधनुष्य पर्यावरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात सर्व वयोगटातील विद्यार्थी व नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महापालिकेचे पर्यावरण संवर्धन अधिकारी मंगेश दिघे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. पर्यावरण महोत्सवात पर्यावरणविषयक चित्रकला आणि शुभेच्छापत्र तयार करण्याची स्पर्धा होणार असून वक्तृत्व, प्रकल्प तयार करा, घोषवाक्य लिहा, संदेश लिहा या स्पर्धाचेही आयोजन करण्यात आले आहे. चित्रकला स्पर्धा ९ डिसेंबर रोजी सारसबाग तसेच संभाजी उद्यान, पर्यावरण मित्र पार्क (भवानी पेठ) येथे सकाळी अकरा ते दुपारी अडीच या वेळेत होईल, तर अन्य सर्व स्पर्धा १० ते १२ डिसेंबर दरम्यान इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रात होणार आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून हा महोत्सव भरवला जात आहे. यंदा इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र आणि परित्राणाय-युथ फॉर चेंज या संस्थांतर्फे इंद्रधनु इको क्लब उपक्रमांतर्गत हे कार्यक्रम होतील. स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी ९९६०३००७७० किंवा ९७६२३२४०८६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यशाळेला चांगला प्रतिसाद
महापालिकेतर्फे ‘ओळख पर्यावरणाची’ या विषयावरील कार्यशाळांचे आयोजन केले जात असून शुक्रवारी सहावी कार्यशाळा चांगल्या प्रतिसादात पार पडली. या कार्यशाळेत घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन आणि घरगुती स्वरुपातील वनस्पतींची लागवड या विषयावर मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रातील पर्यावरण प्रशिक्षक पियुष परांजपे यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा